महा.अं.नि.स खोपोली शाखेमार्फत वावोशी श्री. छत्रपती विद्यालयात वैज्ञानिक उपक्रम संपन्न

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेमार्फत वावोशी येथील श्री. छत्रपती विद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारा मागील विज्ञान हा उपक्रम संपन्न

वावोशी | जतिन मोरे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री. छत्रपती विद्यालय व जुनिअर कॉलेज वावोशी या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारा मागील विज्ञान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या "रमण परिणाम" (Raman Effect) या वैज्ञानिक शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची तरतूद असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत त्यांच्या मनात चिकित्सक वृत्ती, कार्यकारणभावाची समज आणि प्रयोगशीलता विकसित व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आर. टी. जाधव यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संवादक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखा प्रधान सचिव महेंद्र ओव्हाळ हे उपस्थित होते. या कार्यक्रमात वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय.? तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या पद्धती समजावून सांगण्यात आल्या. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची नम्रता, स्वायत्तत्ता, सम्यकता, निर्भयता या मूल्यांवरती विस्तृत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात मंत्रोच्चाराने हवन पेटवणे, जळता कापूर खाणे, हाताला भोक पाडणे असे विविध चमत्कार करून यामागील विज्ञान स्पष्ट करण्यात आले. विज्ञान गीताने या कार्यक्रमात बहर आली. या कार्यक्रमासाठी आठवी ते नववी इयत्तेतील सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते. तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पूर्ण वेळ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेच्या महिला सहभाग विभाग कार्यवाह प्रतिभा मंडावळे तसेच श्री. छत्रपती विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य रणजीत डी. गावित यांनी विशेष सहकार्य केले. व्ही. ए. ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील के. एन. म्हात्रे, आर. एस. मुरमुरे, आर. सी. डूणगे, जे. एन. आलमद, पी. आर. पाटील, एम. व्ही. कुवर, आर. जी. ब्राह्मण आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द

गागोदे खुर्दमध्ये आरक्षण घोटाळा? अनुसूचित जातीचा हक्क हिरावला...