पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अशोक गोतार्णे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अशोक गोतार्णे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

आरपीआय (आठवले)च्या रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी अशोक गोतार्णे यांची नियुक्ती

खोपोलीतील जिल्हास्तरीय बैठकीत घोषणा; पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी दिली जबाबदारी
प्रतिनिधी | जतीन मोरे 
   
             रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची महत्त्वपूर्ण रायगड जिल्हास्तरीय बैठक रविवारी (दि. १९ जुलै) खोपोली येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ व सक्रिय कार्यकर्ते अशोक पांडूरंग गोतार्णे (रा. ठाणेन्हावे, ता. खालापूर) यांची रायगड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र चंद्रकांत गायकवाड यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आले.
         रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आशीर्वादाने व जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्षाची ध्येय-धोरणे, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबवून रायगड जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशा अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. अशोक गोतार्णे हे आरपीआय (आठवले) पक्षाचे जुने, अभ्यासू आणि डॅशिंग कार्यकर्ते म्हणून खालापूर व रायगड जिल्ह्यात परिचित आहेत. सामाजिक, धार्मिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हा कार्याध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. या बैठकीला रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, डॉ. विजय मोरे, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, रविंद्रनाथ ओव्हाळ, जय प्रकाश पवार, पक्ष प्रवक्ते प्रा. मोहन गायकवाड, चिंतामण सोनावणे, सरचिटणीस सुनील सोनावणे, जिल्हा उपाध्यक्ष जयेश शिंदे, मोहनीश गायकवाड,  रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक, प्रभू जाधव, गोपीनाथ सोनावणे, सुनिल सप्रे यांच्यासह विविध तालुक्यांचे अध्यक्ष, खोपोली शहर अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियुक्तीनंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अशोक गोतार्णे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्ह्यात पक्षविस्तार, नव्या कार्यकर्त्यांना संधी आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा अधिक व्यापक प्रसार करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी आरपीआय (आठवले) पक्षाच्या महिला आघाडी च्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

MPCB चा धडाका; नियम मोडणाऱ्या तीन बड्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा

लोधीवलीच्या माजी उपसरपंच मोहिनी निकाळजे काळाच्या पडद्याआड

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द