प्रियकरासाठी पतीचे तीन तुकडे

प्रियकरासाठी पतीचे तीन तुकडे

प्रियकरासाठी पतीचे केले तीन तुकडे, तब्बल अकरा महिन्यांनंतर मर्डर मिस्ट्रीचा खुलासा , दोन्ही आरोपींना पोलिसांनी केली अटक 
प्रतिनिधी | नवी मुंबई :

           नवी मुंबईतून एक धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.. प्रियकारसाठी स्वतःच्या पतीचे तीन तुकडे केल्याची धक्कादायक मर्डर मिस्ट्री समोर आली आहे..
ऐरोलीत एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. तिने पतीचे तीन तुकडे करत विविध ठिकाणी फेकून दिले होते. तिने तब्बल अकरा महिने मर्डर पचवला होता. मात्र आता अखेर तिचं बिंग फुटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. सुनिता कुशवाह (40) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (30) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर बलीराम सूर्यनाथ कुशवाह (50) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
दरम्यान मयत बलीराम कुशवाह हे ऐरोलीच्या यादव नगर परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. मात्र सुनिता हिचे घणसोली येथे राहणारा रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी अनैतिक संबंध होते याला पतीचा विरोध होता. त्यामुळे पतीला कायमचा मार्गातून दूर करण्याचा कट सुनिता आणि राहुल यांनी कायमचे संपवले..
जवळपास आठ महिन्यांनंतर बलीराम यांचा भाऊ गावाहून आल्यानंतर त्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, यानंतर पोलीस तपासात धक्कादायक खुलासा समोर आला.. अखेर पोलिसांनी दोघांना गुप्तपणे ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी केली. त्यांच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर कसून चौकशी केली असता, दोघांनीही थरारक हत्येची कबुली दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

MPCB चा धडाका; नियम मोडणाऱ्या तीन बड्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा

लोधीवलीच्या माजी उपसरपंच मोहिनी निकाळजे काळाच्या पडद्याआड

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द