जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोपाडा NSS विभाग यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोपाडा NSS विभाग यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
प्रतिनिधी | रसायनी :
ग्राम सुधार मंडळ संचालित, जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोपाडा (ता. खालापूर, जि. रायगड) येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने एका स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शनिवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता रा.जि.प. शाळा गुळसुंडे, ता. पनवेल, जि. रायगड येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून करण्यात आले होते. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गोडी पोहोचावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा, या उदात्त हेतूने हा कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. संदेश मोरे सर (पर्यवेक्षक व कार्यक्रम अधिकारी, ज्युनियर कॉलेज पेण) आणि श्री. कुंदन गोरे सर (उप प्राचार्य तथा कार्यक्रम अधिकारी, ज्युनियर कॉलेज जोहे) हे उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची आणि नैतिकतेची भावना कशी रुजवली जाते, यावर प्रकाश टाकला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाशी नाते टिकवून ठेवत अशा सामाजिक कार्यात घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत कातकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग, वह्या आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे उपस्थित चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळत होता.
या प्रसंगीसंस्थेचे ऑफिस सेक्रेटरी वैभव मंडावळे सार्वजनिक जुनियर कॉलेज पेणचे पर्यवेक्षक संदेश मोरे सर जोहे जुनियर कॉलेजचे उपप्राचार्य कुंदन गोरे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे रायगड जिल्हा समनव्यक प्राध्यापक विजय कोंडिलकर सर,माजी विद्यार्थी प्राध्यापक नितीन कडपे सर प्राध्यापक श्री पाडवी सर, टाकेदेवी विद्या मंदिर चे भास्कर गावित व प्रशांत सौदागर सर, शाळेचे मुख्याध्यापक बळीराम पवार कार्यक्रम अधिकारी श्री शेलार सर शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोपाडा यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून आणि गुळसुंदे परिसरातील नागरिकांकडून विशेष आभार व कौतुक व्यक्त केले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा