Posts

वावोशी विद्यालयात पोलिसांकडून सायबर जनजागृती

Image
सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहा; वावोशी विद्यालयात पोलिसांकडून सायबर जनजागृती        पोलीस अधिकारी संतोष आवटी यांनी दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले मार्गदर्शन; 50 पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित वावोशी | जतिन मोरे       सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने सायबर मास निमित्त श्री छत्रपती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, वावोशी (ता. खालापूर, जि. रायगड) येथे दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.            या कार्यक्रमात वावोशी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष आवटी व त्यांचा स्टाफ उपस्थित होता. त्यांनी 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना “सायबर गुन्हे आणि त्यापासून घ्यावयाची काळजी” या विषयावर दृकश्राव्य माध्यमातून (प्रोजेक्टरद्वारे) सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर फसवणूक, सोशल मीडियावरील जबाबदार वापर, ऑनलाइन व्यवहारातील सावधगिरी आणि वैयक्त...

७६ लाख २० हजार रुपयांच्या निधीतून गावाला मिळाला शिक्षणाचा नवा अध्याय

Image
हाळखुर्द गावातील १२० वर्ष जुनी उर्दू शाळेचे नूतनीकरण — आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न     ७६ लाख २० हजार रुपयांच्या निधीतून गावाला मिळाला शिक्षणाचा नवा अध्याय; आमदारांच्या प्रयत्नातून ऐतिहासिक शाळेला नवे जीवन खोपोली | जतिन मोरे      खालापूर तालुक्यातील हाळखुर्द गावात तब्बल 120 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते शनिवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाले. जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत ७६ लाख २० हजार रुपयांचा निधी आमदार थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला असून, या ऐतिहासिक शाळेला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे.         मुंबई–पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या हाळखुर्द गावातील जुनी शाळा जीर्ण अवस्थेत असल्याने तिच्या पुनर्बांधणीची गरज तीव्र होती. सामाजिक कार्यकर्ते हुसेन खान, ग्रामपंचायत उपसरपंच अजीम मांडलेकर आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन आमदार थोरवे यांच्याकडे या मागणीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर ही मागणी...

ओलमन ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

Image
ओलमन ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश     आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांचा 'बाळासाहेब भवन' येथे प्रवेश सोहळा संपन्न वावोशी | जतिन मोरे     आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर दृढ विश्वास व्यक्त करत ओलमन ग्रामपंचायत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.           या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विनोद पादिर, सुदाम हिंदोळा, संतोष पादिर, किरण ठोंबरे, धर्मा नीरगुडा, भागा हिंदोळा, कुमार पादिर, मारुती पादिर, अजित वाघ, भूषण पुंजरा, रवी हिंदोळा, राजेश पादिर, रोहित पादिर, मनीष पारधी, रमेश पादिर, रोहन ठोंबरे, राज मेंगाळ, नीरज पादिर या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या प्रसंगी बोलताना नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “शिवसेनेत कधीही नवा-जुना असा भेदभाव केला जात नाही...

धाटाव येथे बौद्ध वर्षावास प्रवचन मालिकेचा भव्य समारोप

Image
धाटाव येथे बौद्ध वर्षावास प्रवचन मालिकेचा भव्य समारोप      एम. डी. कांबळे यांच्या प्रेरणादायी प्रवचनाने धम्मबांधव मंत्रमुग्ध वावोशी | जतिन मोरे      दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी धाटाव एमआयडीसी परिसरातील खैरवाडी येथे वर्षावास प्रवचन मालिका समारोप उत्साहात पार पडला.          यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोहा तालुका अध्यक्ष मारुती कांबळे यांनी भूषविले, तर कोकण विभागीय अध्यक्ष एम. डी. कांबळे यांनी प्रेरणादायी प्रवचन दिले. त्यांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्मामुळे समाजाच्या प्रगतीचा पाया कसा घातला, याचे विवेचन केले. तसेच तथागत बुद्धांच्या ‘विषादवाद’ आणि ‘विमोचक’ सिद्धांतांची सोप्या भाषेत मांडणी केली. त्यांच्या ओजस्वी विचारांनी उपस्थित धम्मबांधव भारावून गेलेले पहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान प्रवचनकार एम. डी. कांबळे यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा सल्लागार यशवंत शिंदे, सुर्यभान कांबळे, सुप्रिया कांबळे, मिराता...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात कर्जत-खालापूरचा अभिमानास्पद सहभाग

Image
आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत     नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात कर्जत-खालापूरचा अभिमानास्पद सहभाग वावोशी | जतिन मोरे     नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भव्य उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी देश-विदेशातील मान्यवर, विविध राज्यांतील दिग्गज नेते आणि हजारो नागरिक उपस्थित होते. या सोहळ्यात कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करून मतदारसंघाचा सन्मान वाढविला.           कर्जतपासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर उभे राहिलेले हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भविष्यात या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधींमुळे कर्जत-खालापूर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात कार्यरत राहून एक यशस्वी उद्योजक म्हणूनही ओळख असलेल्या आमदार थोरवे यांच्या कार्...

तांबाटी ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

Image
तांबाटी ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण — विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात...     ३.५ लाख उत्पन्नावरून ५ कोटींच्या उंचीवर प्रवास; पारदर्शक आणि कार्यसंस्कृतीचा आदर्श नमुना वावोशी | जतिन मोरे     खालापूर तालुक्यातील सर्वाधिक प्रगतिशील आणि श्रीमंत ग्रुपग्रामपंचायत तांबाटीने विकासाचा नवा टप्पा गाठला आहे. सन १९९२ मध्ये ३.५० लाख वार्षिक उत्पन्नावर कार्यरत असलेली ही ग्रामपंचायत आज तब्बल ५ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवणारी आदर्श ग्रामपंचायत ठरली आहे. या ग्रामपंचायतीच्या नवीन तीन मजली प्रशस्त प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अवजार बँकेचे देखील उद्घाटन करण्यात आले असून ही अवजार बँक रायगड जिल्ह्यातील पहिली अवजार बँक ठरली आहे. विकासाच्या वाटेवर सातत्य आणि जबाबदारी      तांबाटी ग्रामपंचायतीने गेल्या तीन दशकांत औद्योगिक वाढ, CSR निधीचा प्रभावी वापर आणि ग्रामनिधीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे तालुक्यात आणि जिल्ह्यात आघाडीचे स्थान मिळवले आहे. माजी सरपंच शरद कदम यांनी १९९३ च्या...

पेणमध्ये जनआक्रोश : हेटवणे जलबोगदा आणि जेएसडब्ल्यू प्रदूषणाविरुद्ध धरणे आंदोलन पेटले

Image
“तालुक्याचे पाणी वाचवा – प्रदूषण रोखा” घोषणांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर दणाणला; हजारोंचा सहभाग, प्रशासनावर निष्क्रीयतेचे आरोप पेण | जतिन मोरे      हेटवणे जलबोगदा प्रकल्पाचे बेकायदेशीर काम तात्काळ थांबवावे आणि जेएसडब्ल्यू डोलवी प्रकल्पाच्या प्रदूषणकारी विस्ताराला मंजुरी रद्द करावी या दुहेरी मागण्यांसाठी पेणमध्ये रविवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने शेतकरी, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. तालुक्याच्या अस्तित्वाशी निगडित ‘पाणी वाचवा–प्रदूषण रोखा’ या लढ्यामुळे आंदोलनाला प्रचंड तीव्रता लाभली आहे.           हेटवणे धरणातून मुंबईकडे पाणी वळवण्यासाठी सुरू असलेल्या ३.२ मीटर व्यासाच्या जलबोगद्याविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी ठामपणे मागणी केली की, “परवानगीशिवाय सुरू असलेले हे काम तात्काळ थांबवले पाहिजे.” नंदाताई म्हात्रे, समीर म्हात्रे, अभिमन्यू म्हात्रे यांनी प्रशासनावर निष्क्रीयतेचा आरोप ठेवत सांगितले की, “तालुक्याच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा बोगदा कोणत्याही परिस्थितीत चालू देणार ना...