वावोशी विद्यालयात पोलिसांकडून सायबर जनजागृती
सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहा; वावोशी विद्यालयात पोलिसांकडून सायबर जनजागृती पोलीस अधिकारी संतोष आवटी यांनी दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले मार्गदर्शन; 50 पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित वावोशी | जतिन मोरे सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने सायबर मास निमित्त श्री छत्रपती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, वावोशी (ता. खालापूर, जि. रायगड) येथे दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वावोशी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष आवटी व त्यांचा स्टाफ उपस्थित होता. त्यांनी 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना “सायबर गुन्हे आणि त्यापासून घ्यावयाची काळजी” या विषयावर दृकश्राव्य माध्यमातून (प्रोजेक्टरद्वारे) सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर फसवणूक, सोशल मीडियावरील जबाबदार वापर, ऑनलाइन व्यवहारातील सावधगिरी आणि वैयक्त...