महा.अं.नि.स खोपोली शाखेमार्फत वावोशी श्री. छत्रपती विद्यालयात वैज्ञानिक उपक्रम संपन्न
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेमार्फत वावोशी येथील श्री. छत्रपती विद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारा मागील विज्ञान हा उपक्रम संपन्न वावोशी | जतिन मोरे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री. छत्रपती विद्यालय व जुनिअर कॉलेज वावोशी या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारा मागील विज्ञान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या "रमण परिणाम" (Raman Effect) या वैज्ञानिक शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची तरतूद असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत त्यांच्या मनात चिकित्सक वृत्ती, कार्यकारणभावाची समज आणि प्रयोगशीलता विकसित व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आर...