Posts

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

Image
खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी      नाहीतर फेरीवाला हटाव आंदोलन करण्यात येईल राहुल भाई गायकवाड यांचा इशारा   खोपोली : शिवाजी जाधव     शहरातील आठवडी गुरुवारच्या बाजारात राज्यातील विविध भागातील व्यापार करण्यासाठी येत असतात. त्यामुळेच आसपासच्या परिसरातील नागरिक विशेषता महिला वर्ग विविध खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाच संख्या वाढली असल्याने या बाजारात परप्रांतीय व्यापाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या संख्येने वाढली असून सदरील व्यापाऱ्यांनी गुरुवार बाजारातील विविध मुख्य भागांना विळखा घातला असल्याने दिसुन येत नाही..दिपक हॉटेल चौक पासून सुरु होणार आठवडी बाजार खालची खोपोली पर्यंत भरला जाती. परंतु यामध्ये स्थानिक नागरिकांच्या आवश्यक आसलेल्या आपात्कालीन सेवा त्याठिकाणी बाहेरुन आलेल्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले असण्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामध्ये खालच्या खोपोलीतील आपसातील क्षेत्र असलेल्या हायवेलगत स्मशान भुमि समोर खोपोली नगरपरिषद अग्निशमन दल मार्गालगत, पेट्रोल पंप परिसर, मुस्लिम कब्रस्तान गेट स...

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांनी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

Image
एक पाऊल शिक्षणाकडे...     राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांनी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप खालापूर | राहुल जाधव         दरवर्षीप्रमाणे यावर्षी जनता विद्यालय जुनियर कॉलेज मोहॊपाडा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना चे माजी विद्यार्थी यांच्यावतीने वतीने आज शनिवार दिनांक 5 जुलै 2025 रोजी रा. जि. प. शाळा पानशील तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.     या कार्यक्रमाला ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अहिरे सर, मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती वाघ सर, आकृती अकॅडमी चे संचालक म्हात्रे सर, संस्थेच्या संचालिका म्हसकर मॅडम, चव्हाण सर, टाकेदेवी विद्यालयाचे गावित सर, सौदागर सर, कार्यक्रमाधिकारी कोंडीलकर सर, शेलार सर मा. विद्यार्थी प्रतिनिधी पत्रकार प्रतिक चाळके, शाळेच्या मुख्याध्यापिका साबले मॅडम, शिक्षक विटकर सर तसेच एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य अहिरे सर व चव्हाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेच्या मुख्याध्यापिका साबळे मॅडम ...

राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी रामचंद्र (रामभाऊ) पवार यांची निवड

Image
राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी रामचंद्र (रामभाऊ) पवार यांची निवड खोपोली : शिवाजी जाधव      भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी रामचंद्र (रामभाऊ) पवार यांची तीच संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस बलबीर नेगी यांनी नियुक्ती केली.      संपूर्ण देशात भारतीय जनता प्रणित राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना कार्यरत आहे. अभिनंदन सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम अविरत पणे सुरू आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदर संघटना सदैव तत्पर आहे.        संपूर्ण रायगड जिल्ह्यात कामगारां साठी झटणारे, कामगारांना न्याय देण्यासाठी धडपड करणारे, माथाडी संघटनेच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये कामगारांसाठी लढा उभारणारे कामगार नेते म्हणून हा (रामभाऊ) पवार यांचे नाव अग्रेसर आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस बलबीर नेगी यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी रामचंद्र पवार यांची निवड केली. त्यांची निवड होतात खोपोली श...

हिल इंडिया चे माजी कर्मचारी ए.एस.लोखंडे यांची शोकसभा शोकाकुल वातावरणात संपन्न

Image
हिल इंडिया चे माजी कर्मचारी ए.एस.लोखंडे यांची शोकसभा शोकाकुल वातावरणात संपन्न रसायनी : प्रतिनिधी          रसायनी परिसरातील केंद्र सरकारचा उपक्रम असणाऱ्या हिल इंडिया कंपनीचे माजी कर्मचारी व मुळ गाव महाड येथील ए.एस.लोखंडे यांचे रविवार दि. 22 जुन रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यावेळी मोहोपाडा येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांचा अंत्यविधी पार पाडला गेला. त्यावेळी त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, कंपनीतील आजी माजी सहकारी आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांना अंदाजे एक मुलगा व दोन मुली असल्याची माहिती आहे.     त्यांचा शोकसभा व पुण्यानुमोदन कार्यक्रम काल रविवार दिनांक 29 रोजी मोहोपाडा आळी आंबिवली येथील राहत्या घरी पार पडला. यावेळी बौद्धाचारी यांच्यावतीने धम्म पूजा पाठ करून पुण्यानुमोदन कार्यक्रम पार पाडला. तर सामाजिक कार्यकर्ते एन एम वाघमारे, ऍड. दांडगे, मुख्याध्यापक पी. एल गायकवाड, भोजने आदींनी लोखंडे यांच्या जीवन कार्यावर विचार प्रकट करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी वक्त्यांनी लोखंडे यांनी कंपनीत केलेल्या कार्याचा पाढा वाचला,...

शिवसहयाद्री सेवा सहकारी संस्थेच्या वतीने नेरळ ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपण

Image
स्वा. माँ साहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळ (दादर) अंतर्गत      शिवसहयाद्री सेवा सहकारी संस्थेच्या वतीने नेरळ ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपण आंदोलन वृत्तसेवा : शिवाजी जाधव     पृथ्वीभोवती हवेत गोळा होत असलेल्या कार्बनडाय ऑक्साइडसारख्या वायूंमुळे जागतिक तापमानात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे अनेक भागात उष्णतेच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यापासून बाचावाकरिता परिसरात वृक्षरोपण करणे आवश्यक असल्याने फुलबाजार व्यापारी मंडळ (दादर) अंतर्गत शिवसहयाद्री सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार व व्यापारी पदाधिकारी यांनी कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत 200 कडुलिंबू झाडांचे रुक्षरोपण केले. घेण्यात आलेल्या वृक्षारोपन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई दादर येथील नेते मनोज कुंडे , मच्छिंद्र शेलार , नेरळचे ग्रामसेवक सुदाम कारले व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.. मागील वर्षी देखील खालापूर तालुक्यातील खोपोली शिळफाटा हद्दीत फुलबाजार व्यापारी मंडळ (दादर) यांनी 200 विविध जातीची झाडे लावली होती. व वर्षी त...

ताराराणी ब्रिगेडच्या मध्यस्थीने सनशिल्ड केमिकल कंपनीमध्ये बंदिस्त असलेला क्रेन मशीन मुख्य मालकाच्या ताब्यात

Image
ताराराणी ब्रिगेडच्या मध्यस्थीने सनशिल्ड केमिकल कंपनीमध्ये बंदिस्त असलेला क्रेन मशीन मुख्य मालकाच्या ताब्यात आंदोलन | प्रतिनिधी :  पाली - सुधागड तालुक्यातील पाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सनशिल्ड केमिकल कंपनीमध्ये पुण्यातील अन्सारी नामक मालकाचा क्रेन मशीन गेली सात महिने चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करण्यात आला होता. क्रेन मशीन मालक अन्सारी आपले क्रेन कंपनी बाहेर काढण्यासाठी अनेक पद्धतीने प्रयत्न करत होते. परंतु काही करूनही त्यांच्या मालकीचा बंदिस्त असलेला क्रेन मशीन बाहेर काढणे शक्य न्हवते. खुप प्रयत्न करूनही अस्वस्थ झालेल्या मालकाने ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे यांची भेट घेत मदतीची विनवणी केली. क्रेन मशीनवर अन्सारी यांचा कुटुंबीयांचा उदरनिर्वाह असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली हे ओळखून वंदनाताई मोरे यांनी पाली पोलिस ठाण्यात भेट घेत पोलिस निरीक्षक चव्हाण मॅडम यांच्याकडे तोंडी तक्रार केली. सदरील प्रकरण लक्षात घेत चव्हाण मॅडम यांनी सनशिल्ड केमिकल कंपनी व्यवस्थापन यांना बोलून घेत त्यांचे म्हणणे एकूण घेत त्यावर मार्ग काढावा असे सांगितले. क...

खोपोलीतील उद्योजक यशवंतशेठ साबळे यांचा अचानक भाजप पक्ष प्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ...

Image
खोपोलीतील उद्योजक यशवंतशेठ साबळे यांचा अचानक भाजप पक्ष प्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ... खोपोली | प्रतिनिधी :  दिनांक 15 जून रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील CKT कॉलेज मध्ये भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, मंत्री रवींद्र चव्हाण, यांच्या हस्ते व आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर रायगड महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खोपोलीतील नामवंत उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे यशवंतशेठ साबळे, माजी नगरसेवक अविनाशभाऊ तावडे, युवा उद्योजक विक्रमशेठ साबळे यांनी आपल्या शेकडो सहकारी मित्रांसोबत अचानक भाजप पक्षात प्रवेश केला. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चा रंगली आहे. साबळे यांच्या प्रवेशामुळे भाजपची स्थिती खोपोली शहरात मजबूत होणार असून याचा फायदा निश्चितच पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनाही होणार आहे.       राजकारणापासून दूर असणारे यशवंतशेठ साबळे यांच्या अचानक राजकारणात प्रवेशामुळे सर्वत्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या प्रवेशाने खोपोलीच्या राजकारणात अनेकांना नक्की धक्का बसला अशी ही...