खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी
खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी नाहीतर फेरीवाला हटाव आंदोलन करण्यात येईल राहुल भाई गायकवाड यांचा इशारा खोपोली : शिवाजी जाधव शहरातील आठवडी गुरुवारच्या बाजारात राज्यातील विविध भागातील व्यापार करण्यासाठी येत असतात. त्यामुळेच आसपासच्या परिसरातील नागरिक विशेषता महिला वर्ग विविध खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाच संख्या वाढली असल्याने या बाजारात परप्रांतीय व्यापाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या संख्येने वाढली असून सदरील व्यापाऱ्यांनी गुरुवार बाजारातील विविध मुख्य भागांना विळखा घातला असल्याने दिसुन येत नाही..दिपक हॉटेल चौक पासून सुरु होणार आठवडी बाजार खालची खोपोली पर्यंत भरला जाती. परंतु यामध्ये स्थानिक नागरिकांच्या आवश्यक आसलेल्या आपात्कालीन सेवा त्याठिकाणी बाहेरुन आलेल्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले असण्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामध्ये खालच्या खोपोलीतील आपसातील क्षेत्र असलेल्या हायवेलगत स्मशान भुमि समोर खोपोली नगरपरिषद अग्निशमन दल मार्गालगत, पेट्रोल पंप परिसर, मुस्लिम कब्रस्तान गेट स...