Posts

​'आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा' येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

Image
​'आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा' येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा ​जांभूळपाडा (प्रतिनिधी): येथील आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा या विद्यालयात आज, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी 'मराठी राजभाषा दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात मराठी भाषेचा गौरव करण्यात आला. ​कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात शिक्षिका सुगंधा जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचा समृद्ध वारसा, तिचा इतिहास आणि साहित्यातील महत्त्व यावर प्रकाश टाकला. "मराठी ही केवळ आपली मातृभाषा नसून ती आपली ओळख आहे," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ​कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: • ​मार्गदर्शन: शिक्षिका सुगंधा जाधव यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. ​• शिक्षकांचा सहभाग: कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक वृंद पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होता. व्यासपीठावरील फलकावर "मराठी दिन" निमित्त सुंदर सजावट करण्यात आली होती. ​•...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रसायनी येथे कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबिर उत्साहात

Image
अखिल भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रसायनी येथे कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबिर उत्साहात       माता रमाई जयंतीनिमित्त आयोजन; प्रा. आनंद देवडेकर यांचे कार्यकर्ता आचारसंहितेवर मार्गदर्शन, १५० उपासक - उपासिका उपस्थित वावोशी | जतिन मोरे       रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अखिल भारतीय बौद्ध महासंघ या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने जिल्हा रायगड स्तरावर माता रमाई जयंतीचे औचित्य साधून कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर रसायनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रसायनी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा रायगड शाखेचे अध्यक्ष दीपक श्रीधर खाडे होते, तर उद्घाटक म्हणून संस्थापक व राष्ट्रीय महासचिव व्ही.जे.गायकवाड उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पूज्य भंते अधिचित्तो यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन केले.       या शिबिराची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने झाली. आप्पा साळवे यांनी ध्वजवंदन गीत सादर केले. त्यानंतर आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात...

आजारपणातही नात्यांची ऊब जपणारे नामदेव वाळकू मोरे काळाच्या पडद्याआड

Image
आंबेडकरी विचारांचे निष्ठावंत कार्यकर्ते; १५ फेब्रुवारीला खोपोलीतील नालंदा बुद्धविहारात शोकसभा व पुण्यानुमोदन वावोशी | जतिन मोरे      वावोशी गावचे सुपुत्र व प्रेमळ, शांत स्वभावामुळे सर्वपरिचित असलेले नामदेव वाळकू मोरे (वय ७४) यांचे ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. १९५२ साली वावोशी येथे सामान्य कुटुंबात जन्मलेले नामदेव मोरे यांनी पुढे वडिलांच्या खोपोली येथील भातगिरणीतील नोकरीमुळे खोपोली येथे वास्तव्यास राहून कष्टमय जीवन जगले. ते खोपोलीतील इलॅविटर कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करून आदर्श कामगार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत त्यांनी तीन मुले व एका मुलीला शिक्षण देऊन त्यांचा उत्तम सांभाळ केला. नामदेव मोरे यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, आपुलकीचा व माणुसकी जपणारा होता. नातेवाईक व मित्रमंडळींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मागील पाच ते सहा वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजारामुळे ते बहुतांश वेळ घरीच असत; मात्र या काळातही त्यांनी फोनद्वारे सर्वांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्य...

शिवसेना–भाजप–आरपीआय महायुती मैदानात; उबाठावर थोरवेंची जोरदार टीका

Image
खालापूरमध्ये महायुतीचा भगवा रणसंग्राम     शिवसेना–भाजप–आरपीआय महायुती मैदानात; उबाठावर थोरवेंची जोरदार टीका – “घड्याळाला निष्ठावंत शिवसैनिक कधीही मतदान करणार नाही” खालापूर | राहुल जाधव  खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) या महायुतीने दमदार शक्तीप्रदर्शन करत निवडणूक रणांगणात उडी घेतली आहे. चारही जिल्हा परिषद जागांपैकी दोन जागांवर भाजप, तर दोन जागांवर शिवसेनेचे उमेदवार, तसेच पंचायत समितीच्या आठ गणांपैकी पाच भाजप व तीन शिवसेनेचे उमेदवार अशा ठोस बलाबलासह महायुती निवडणूक लढवत असल्याची माहिती कर्जत–खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली.         उमेदवारी अर्ज दाखल करताना संपूर्ण खालापूर तालुक्यातून उत्स्फूर्त जनसमर्थन पाहायला मिळाले असून, यामुळे महायुतीच्या विजयाची पुनरावृत्ती निश्चित असल्याचा विश्वास आमदार थोरवे यांनी व्यक्त केला. “शिवसेना–भाजप ही पारंपरिक युती आहे. खोपोली नगरपालिकेत महायुतीच्या माध्यमातून ऐतिहासिक विजय मिळवला असून, जिल्हा...

वावोशी भीमनगर येथे महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

Image
वावोशी भीमनगर येथे महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण; टाटा स्टील फाउंडेशनचा पुढाकार वावोशी | जतिन मोरे       टाटा स्टील फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत वावोशी येथील भीमनगर परिसरात महिलांसाठी दोन दिवसीय डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात परिसरातील ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.        महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, शासकीय योजनांचा स्वतःहून लाभ घेता यावा तसेच मोबाईलचा सुरक्षित व परिणामकारक वापर करता यावा, हा प्रशिक्षणाचा उद्देश होता. प्रशिक्षणादरम्यान डिजिलॉकर, मेरा रेशन, ई-आधार, आयुष्यमान भारत योजना यांसह सायबर सुरक्षितता व मोबाईल सेफ्टीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. टाटा स्टील फाउंडेशनच्या फिल्ड कोऑर्डिनेटर करूणा कदम यांनी डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षक रंजना राणे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मोबाईल ॲप्सचा वापर समजावून सांगितला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये डिजिटल आत्मविश्वास वाढल्याचे सहभागी महिलांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमाला प्रशिक्षक...

वावोशीचे शर्यतप्रेमी व कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्त्व हरिश्चंद्र हातनोलकर यांचे निधन

Image
वावोशीचे शर्यतप्रेमी व कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्त्व हरिश्चंद्र हातनोलकर यांचे निधन; रामनवमी कुस्ती स्पर्धेचे प्रमुख पंच, माजी पैलवान व सामाजिक कार्यकर्त्याला गावाचा भावपूर्ण निरोप वावोशी | जतिन मोरे        वावोशी गावातील बैलशर्यती आणि कुस्तीची आवड जिवंत ठेवणारे, क्रीडासंस्कृतीचे जतन करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरिश्चंद्र हातनोलकर (वय ७९) यांचे २५ डिसेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वावोशीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.           रामनवमीच्या निमित्ताने वावोशी येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या कुस्ती स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यासह विविध भागांतील नामवंत व गाजलेले पैलवान सहभागी होत असत. या कुस्तीच्या आखाड्यात हरिश्चंद्र हातनोलकर हे प्रमुख पंच म्हणून निष्पक्ष व जबाबदारीची भूमिका बजावत असत. त्यांच्या निर्णयांमुळे कुस्ती स्पर्धांना विशेष प्रतिष्ठा लाभली होती. हरिश्चंद्र हातनोलकर हे स्वतः पूर्वीचे पैलवान होते. त्यांनी आपल्या तारुण्यात अनेक कुस्त्यांमध्ये बाजी मारून विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले ह...

१ जानेवारी भीमा-कोरेगाव शौर्यदिन सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त मंजुरी

Image
१ जानेवारी भीमा-कोरेगाव शौर्यदिन सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त मंजुरी; न्यायालयाच्या अटींचे पालन करण्याचे आवाहन वावोशी | जतिन मोरे      भीमा-कोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिन कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२६ रोजी शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन करता येणार आहे.          भीमा-कोरेगाव येथील जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने दरवर्षी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान वादी व प्रतिवादी यांच्या वतीने संबंधित वकिलांनी आपापल्या बाजू सविस्तरपणे मांडल्या. या प्रकरणात प्रतिवादी म्हणून भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग स्वतः न्यायालयात उपस्थित होते, तर प्रतिवादींची बाजू ॲड. रुपेश लांजेकर यांनी मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने काही सशर्त अटी घालून भीमा-कोरेगाव शौर्य...