तांबाटी ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
तांबाटी ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण — विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात... ३.५ लाख उत्पन्नावरून ५ कोटींच्या उंचीवर प्रवास; पारदर्शक आणि कार्यसंस्कृतीचा आदर्श नमुना वावोशी | जतिन मोरे खालापूर तालुक्यातील सर्वाधिक प्रगतिशील आणि श्रीमंत ग्रुपग्रामपंचायत तांबाटीने विकासाचा नवा टप्पा गाठला आहे. सन १९९२ मध्ये ३.५० लाख वार्षिक उत्पन्नावर कार्यरत असलेली ही ग्रामपंचायत आज तब्बल ५ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवणारी आदर्श ग्रामपंचायत ठरली आहे. या ग्रामपंचायतीच्या नवीन तीन मजली प्रशस्त प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अवजार बँकेचे देखील उद्घाटन करण्यात आले असून ही अवजार बँक रायगड जिल्ह्यातील पहिली अवजार बँक ठरली आहे. विकासाच्या वाटेवर सातत्य आणि जबाबदारी तांबाटी ग्रामपंचायतीने गेल्या तीन दशकांत औद्योगिक वाढ, CSR निधीचा प्रभावी वापर आणि ग्रामनिधीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे तालुक्यात आणि जिल्ह्यात आघाडीचे स्थान मिळवले आहे. माजी सरपंच शरद कदम यांनी १९९३ च्या...