पोस्ट्स

वावोशी-परखंदे रस्त्याच्या निकृष्ट दुरुस्तीवर पत्रकारांचा आक्षेप

इमेज
दर्जेदार कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन   अभियंत्याच्या उपस्थितीत व तांत्रिक निकषांचे पालन करूनच रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी वावोशी | जतिन मोरे         खालापूर तालुक्यातील वावोशी–परखंदे धनगरवाडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त तांत्रिक निकषांनुसार व दर्जेदार पद्धतीने भरावेत, तसेच कामाच्या वेळी संबंधित अभियंता किंवा अधिकृत तांत्रिक पर्यवेक्षकाची प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक करावी, अशी मागणी छत्तीशी मराठी पत्रकार संघ, खालापूर यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता/शाखा अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.          निवेदनात म्हटले आहे की, वावोशी–परखंदे धनगरवाडी मार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर अपघाताचा धोका दिवसेंद...

पत्रकारितेतील प्रभावी नेतृत्व: रसायनीचे राकेश खराडे आता 'महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष

इमेज
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी राकेश खराडे यांची बिनविरोध निवड रसायनी | प्रतिनिधी :        रायगड जिल्ह्यातील रसायनी येथील नामांकित पत्रकार राकेश खराडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकार समूहात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी राकेश खराडे यांनी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष ही पदे यशस्वीपणे भूषविली असून संघटनात्मक कार्यात सक्रिय योगदान देत त्यांनी पुढील वाटचाल केली आहे. कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर तसेच मुंबई या जिल्ह्यांचे मुख्य प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी व राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी प्रदान केले आहे. निवडीनंतर बोलताना राकेश खराडे म्हणाले की, “महाराष...

पर्यटनाचा आनंद बनला दुःखाचा काळ! सोलनपाडा डॅमवर मुंबईतील तरुणाचा पाण्यात वाहून दुर्दैवी अंत

इमेज
🔸सोलनपाडा डॅम परिसरात पावसाळी पर्यटनादरम्यान तरुणाचा पाण्यात वाहून मृत्यू! 🔸सांडव्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दुर्घटना; मुंबईतील चार मित्रांपैकी एकाचा दुर्दैवी अंत! प्रतिनिधी | कर्जत :        कर्जत तालुक्यातील सोलनपाडा डॅम परिसरात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका २४ वर्षीय तरुणाचा सांडव्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २ ऑगस्ट) दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळा येथील चार मित्र पावसाळी पर्यटनासाठी सोलनपाडा येथे आले होते. दुपारी सुमारे १.०० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान हे सर्वजण डॅमच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या खालच्या बाजूस पाण्यात उतरून आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामध्ये अरमान अब्दुल लतीफ (वय २४) हा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील यांनी कशेळे आऊटपोस्ट पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे द...

खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल...

इमेज
आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मध्यरात्री एफआयआर; तपासाच्या कक्षेत औषध कंपनीसह आणखी संबंधितांची चौकशी करण्याची मागणी पेण | जतिन मोरे      पेण तालुक्यातील वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तब्बल दीड वर्षांच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर अखेर पेण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०६(१) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता मधुकर गजबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खुशबूचे वडील नामदेव ठाकरे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि राजीव गांधी पंचायत राज संघटन यांच्या न्यायासाठीच्या संघर्षाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.      २२ जानेवारी २०२५ रोजी उपचारादरम्यान खुशबू ठाकरे हिचा मृत्यू झाला होता. मृत्यूबाबत संशय व्यक्त करत तिचे वडील नामदेव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, राजीव गांधी पंचायत राज संघटन आणि स्थानिक आदिवासी बांधवांनी विविध निवेदने, आंदोलने तसेच ६ मे २०२५ रोजी तहसील कार्यालय, पेण येथे काढल...

खालापुरात समाजकारणाचा अन् पत्रकारितेचा गौरव!

इमेज
 डॉ. रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचा गौरव; 'खालापूर जनसामान्यांची दिशा'च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन उत्साहात. स्वामी विवेकानंद विद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; समाजाभिमुख पत्रकारितेच्या नव्या पर्वाची सुरुवात खालापूर / जतिन मोरे :         रायगड भूषण तथा महाराष्ट्राची भूमी साप्ताहिकाचे संपादक डॉ. रविंद्र विष्णू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध मान्यवरांच्या सन्मान सोहळ्यासह 'खालापूर जनसामान्यांची दिशा' या नव्या वर्तमानपत्राच्या प्रथम अंकाच्या प्रकाशनाचा सोहळा मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी स्वामी विवेकानंद विद्यालय, खालापूर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोपोली नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुनील पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ उत्तर कोकण किनारपट्टी विभाग, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथील रवींद्र मर्दाने, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. पाटील, ॲड. मिलिंद सुरवकर, ॲड. रमेश पाटील, बँक ऑफ इंडिया, खालापूर शाखेच...

​पाऊस रोखू शकला नाही जनआक्रोश! खालापूरात उपवर्गीकरणाविरोधात आठवले गटाचे रान पेटले

इमेज
🔸उपवर्गीकरणाविरोधात खालापूरात आरपीआय (आठवले)चा एल्गार; मुसळधार पावसात खालापूरात धडकला जनआक्रोश मोर्चा 🔸" समाजात फूट पाडण्याचा डाव हाणून पाडू, अन्यथा आगामी निवडणुकांत भूमिका बदलू" - आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा सरकारवर घणाघात खालापूर / जतिन मोरे        अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित धोरणाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने खालापूर तहसील कार्यालयावर सोमवारी दि. २७ जुलै रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला-पुरुष, युवक-युवती तसेच मागासवर्गीय समाजातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले. महाराष्ट्र सरकारच्या उपवर्गीकरणाच्या धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.         आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आणि रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, खालापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत (एस.के.) कांबळे यांच्या नेतृत...

शेकापच्या वर्धापन दिनाला खालापूर सज्ज! दहा हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

इमेज
खालापूरमध्ये शेकापच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी; दहा हजार कार्यकर्त्यांसाठी भव्य सभा मंडप उभारणी अंतिम टप्प्यात खालापूर | जतिन मोरे :           शेतकरी कामगार पक्षाच्या २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या पार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी आयोजन समितीसह प्रत्यक्ष सभा स्थळाची पाहणी करून आयोजनाचा आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्गालगत जुन्या राशी पेट्रोल पंप परिसरात उभारण्यात येत असलेला भव्य सभा मंडप पाहून त्यांनी विविध समित्यांना आवश्यक सूचना दिल्या. आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था करण्यात येत आहे. सभास्थळी येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, पत्रकारांसाठी विशेष कक्ष, तसेच एलईडी स्क्रीनद्वारे संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अशी अत्याधुनिक व्यवस्था उभारण्यात येत आहे. कार्यक्रमाचे नियोजन अधिक सुसूत्र आणि शिस्तबद्ध व्हाव...

​खोपोली नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह

इमेज
खोपोली नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह; ओळखीसाठी पोलिसांची नागरिकांना साद खोपोली, दि. २७ (प्रतिनिधी) :        खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहाटवडे येथील रेल्वे ट्रॅकजवळील नदीपात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.      पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास रहाटवडे येथील रेल्वे ट्रॅकलगतच्या नदीपात्रात एक तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच खोपोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तपासणीअंती संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.     या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत तरुणाच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे ३० वर्षे, उंची सुमारे ५ फूट, मध्यम बांधा व गोरा वर्ण असून चेहऱ्यावर दाढी आहे. त्याने निळ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट परिधान केला होता. मात्र, अद्याप त्याची ओळख ...

ग्रामविकास अधिकारी'विना मोहोपाडा-वासांबे ग्रामपंचायत कोमात

इमेज
ग्रामविकास अधिकारी'विना मोहोपाडा-वासांबे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प; ७५ हजार नागरिकांचे हाल 🔸१५ दिवसांपासून पद रिक्त; दाखले, ज्येष्ठ नागरिकांची कामे आणि विकास निर्णय रखडले – २७ जुलैपर्यंत नियुक्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा 🔸ग्रामविकास अधिकाऱ्याच्या रिक्त पदाचा फटका;  मोहोपाडा-वासांबे तील प्रशासन कोमात. 🔸दररोज शेकडो नागरिकांची गैरसोय; २७ जुलैपर्यंत नियुक्तीची मागणी रसायनी | प्रतिनिधी         मोहोपाडा-वासांबे ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारीपद गेल्या पंधरा दिवसांपासून रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार अक्षरशः ठप्प झाला आहे. विविध शासकीय दाखले, ज्येष्ठ नागरिकांची प्रलंबित कामे, विद्यार्थ्यांचे शाळेसाठी आवश्यक दाखले, उत्पन्नाचे दाखले तसेच विकासकामांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय रखडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.          दि. ८ जुलै रोजी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांची रायगड जिल्हा परिषदेमार्फत अचानक बदली करण्यात आली. मात्र, त्यांच...

कै.सार्थकच्या स्मृतीत फुलले विद्यार्थ्यांचे चेहरे

इमेज
कै.सार्थकच्या स्मृतीत फुलले विद्यार्थ्यांचे चेहरे ⚫ रसायनीत पत्रकार संघाकडून शैक्षणिक साहित्य, खुर्ची भेट व वृक्षारोपण रसायनी | राहुल जाधव       'विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीच खरी आदरांजली असते', याच भावनेतून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कै. सार्थक राकेश खराडे यांच्या ७ व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त शुक्रवार, दि. २४ जुलै २०२५ रोजी रसायनी रेल्वे स्थानकाजवळील कष्टकरीनगर राजिप शाळेमध्ये अत्यंत प्रेरणादायी व समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात कौतुकाचे वातावरण पाहायला मिळाले.      या दिमाखदार व सामाजिक कार्यक्रमाला रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश काशिनाथ खराडे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर शिंदे, पनवेल तालुका अध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा सदस्य राहुल जाधव, पत्रकार गौतम सोनावणे, पत्रकार अमोल सांगळे, पत्रकार असीम शेख, पत्रकार प्रतिक चाळके आणि अनिल रेपाळे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच तुराडे ग्रामपंचायत सरपंच रंजना गाय...

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अशोक गोतार्णे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

इमेज
पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अशोक गोतार्णे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती आरपीआय (आठवले)च्या रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी अशोक गोतार्णे यांची नियुक्ती खोपोलीतील जिल्हास्तरीय बैठकीत घोषणा; पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी दिली जबाबदारी प्रतिनिधी | जतीन मोरे                   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची महत्त्वपूर्ण रायगड जिल्हास्तरीय बैठक रविवारी (दि. १९ जुलै) खोपोली येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ व सक्रिय कार्यकर्ते अशोक पांडूरंग गोतार्णे (रा. ठाणेन्हावे, ता. खालापूर) यांची रायगड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र चंद्रकांत गायकवाड यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आले.          रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आशीर्वादाने व जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्...

सावरोली-खारपाडा रस्त्यावर गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक पलटी;

इमेज
सावरोली-खारपाडा रस्त्यावर गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक पलटी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, दुकाने व विजेच्या खांबांचे नुकसान प्रतिनिधी | खालापूर :           खालापूर तालुक्यातील सावरोली-खारपाडा रस्त्यावर कुंभीवली गावाजवळ तब्बल ३५० गॅस सिलेंडर वाहून नेणारा एक ट्रक अचानक पलटी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्दैवी घटना घडलेली नाही. मात्र, ट्रक रस्त्याशेजारी उलटल्याने परिसरातील काही दुकानांचे गाळे, विजेचे पोल आणि पाण्याच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भरलेले गॅस सिलेंडर असल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक चावणे येथून पुण्याच्या दिशेने निघाला होता. कुंभीवली गावाजवळ आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्ता सोडून शेजारील खड्ड्यात उलटला. गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उलटल्याचे समजताच परिसरातील नागरिक धावून आले. या घटनेची गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी तातडी...

कर्तव्यावर असलेल्या पोलिस जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; स्वतः कार चालवत असताना काळाचा घाला.

इमेज
कर्तव्यावर असलेल्या पोलिस जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; स्वतः कार चालवत असताना काळाचा घाला. प्रतिनिधी | कर्जत             कर्जत–मुरबाड महामार्गावरील कळंब–चाहूचीवाडी परिसरात बुधवारी (१५ जुलै) रात्री झालेल्या भीषण अपघातात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जवान ऋतिक किसन ढोले (वय २६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातावेळी ऋतिक हे स्वतः इको कार चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अन्य चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक ढोले हे आपल्या चार मित्रांसह इको कारमधून कळंब येथून चाहूचीवाडी येथील आपल्या घरी निघाले होते. रात्रीच्या सुमारास गावाजवळील धोकादायक वळणावर कारवरील त्यांचा ताबा सुटल्याने वाहन भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक रेलिंगवर जाऊन जोरात आदळले. धडक इतकी भीषण होती की कारचा एक भाग हवेत उचलला गेला आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळंब पोलीस चौकीचे अधिकारी आणि कर्म...

प्रियकरासाठी पतीचे तीन तुकडे

इमेज
प्रियकरासाठी पतीचे तीन तुकडे प्रियकरासाठी पतीचे केले तीन तुकडे, तब्बल अकरा महिन्यांनंतर मर्डर मिस्ट्रीचा खुलासा , दोन्ही आरोपींना पोलिसांनी केली अटक  प्रतिनिधी | नवी मुंबई :            नवी मुंबईतून एक धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.. प्रियकारसाठी स्वतःच्या पतीचे तीन तुकडे केल्याची धक्कादायक मर्डर मिस्ट्री समोर आली आहे.. ऐरोलीत एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. तिने पतीचे तीन तुकडे करत विविध ठिकाणी फेकून दिले होते. तिने तब्बल अकरा महिने मर्डर पचवला होता. मात्र आता अखेर तिचं बिंग फुटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. सुनिता कुशवाह (40) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (30) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर बलीराम सूर्यनाथ कुशवाह (50) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान मयत बलीराम कुशवाह हे ऐरोलीच्या यादव नगर परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. मात्र सुनिता हिचे घणसोली येथे राहणारा रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी ...

एक हात मदतीचा' उपक्रमातून ४५ गरजू विद्यार्थ्यांना सायकली; शिक्षणाच्या वाटेला मिळाले नवे पंख

इमेज
 एक हात मदतीचा' उपक्रमातून ४५ गरजू विद्यार्थ्यांना सायकली; शिक्षणाच्या वाटेला मिळाले नवे पंख मुंबई पोलिस दलातील पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे यांच्या १४ वर्षांच्या सेवाभावी उपक्रमाला उन्नतनगर अक्षय को-ऑप. हौसिंग सोसायटीची साथ; पुस्तक संच, खाऊ व शैक्षणिक साहित्याचेही वाटप प्रतिनिधी | हातोंड - सुधागड        सुधागड तालुक्यातील हातोंड गावचे सुपुत्र तथा मुंबई पोलिस दलातील पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे यांनी गेल्या १४ वर्षांपासून राबविलेल्या "द्या एक हात मदतीचा, सामाजिक बांधिलकीचा, शैक्षणिक क्रांतीचा" या उपक्रमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळत आहे. यंदा गोरेगाव (मुंबई) येथील उन्नतनगर अक्षय को-ऑप. हौसिंग सोसायटीच्या सहकार्याने हातोंड, माठल, कसईशेत, चंदरगाव व परिसरातील ४५ गरजू विद्यार्थ्यांना सायकली, इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.       सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत सोसायटीचे कार्यवाहक विवेकानंद सावंत, चेअरमन कानमल जैन आणि सदस्यांनी ४५ सायकली संकलित कर...

माथेरानच्या हनिमून पॉईंटवर बिबट्याचा थरार!

इमेज
  माथेरानच्या हनिमून पॉईंटवर बिबट्याचा थरार! सीसीटीव्हीत कैद झाली श्वानासोबतची झडप;    पर्यटकांसह स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण प्रतिनिधी | माथेरान, कर्जत                ​पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान नगरीतून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. माथेरानमधील प्रसिद्ध 'हनिमून पॉईंट' परिसरात एका बिबट्याने थेट दर्शन दिले असून, त्याचा एका श्वानासोबत (कुत्र्यासोबत) झालेल्या झडपेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.             ​मिळालेल्या माहितीनुसार, हनिमून पॉईंट परिसरातील स्थानिक दुकानदार सनगरे यांच्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार रात्रीच्या सुमारास कैद झाला. रात्रीच्या शांततेत एक बिबट्या या परिसरात शिकारीच्या शोधात फिरत असताना अचानक तिथे असलेल्या एका श्वानाशी त्याची समोरासमोर झडप झाली. हा थरारक प्रसंग सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत असून, या घटनेचा व्हिडि...

पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध केमिकल व गॅस गोदामांवर महापालिकेचा धडक मोर्चा

इमेज
पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध केमिकल व गॅस गोदामांवर महापालिकेचा धडक मोर्चा     'हेल्प फाउंडेशन'च्या "एक्सपर्ट्ससह" व्यापक तपासणी सुरू प्रतिनिधी | ​पिंपरी-चिंचवड        शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सध्या संपूर्ण शहरात एक व्यापक आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील रासायनिक (केमिकल) आणि गॅस व्यावसायिकांच्या साठवणूक व्यवस्था, सुरक्षेचे कडक निकष आणि त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीची अत्यंत सखोल आणि काटेकोर तपासणी केली जात आहे. भविष्यात घडू शकणारे संभाव्य अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. ​या विशेष तपासणी मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, तांत्रिक अचूकतेसाठी 'HELP Foundation' चे नामांकित केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांचे प्रशासनाला महत्त्वपूर्ण तांत्रिक सहकार्य लाभत आहे. सुरक्षेचे निकष तपासण्यात त्यांच्या सोबतीला कार्तिक गुजरे हे देखील सक्रियपणे कामगिरी चोख बजावत आहेत. या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे रासायनिक साठ्यांची तांत्रिक ...

​खालापूरच्या दुर्गम भागात गर्भवती महिलेला उपचारासाठी आजही ‘झोळीचा’ आधार!

इमेज
​खालापूरच्या दुर्गम भागात गर्भवती महिलेला उपचारासाठी आजही ‘झोळीचा’ आधार! प्रतिनिधी | ​खालापूर:           एकीकडे राज्य सरकारकडून डिजिटल इंडिया आणि गावोगावी विकासाच्या गंगा पोहोचल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातून एक अत्यंत क्लेशदायक आणि भीषण वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात रस्ते आणि पायाभूत सुविधांअभावी एका गर्भवती महिलेला चक्क झोळीत टाकून मैलोनमैल डोंगराळ रस्त्यावरून दवाखान्यात नेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. या घटनेमुळे डोंगर-दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी बांधवांची आजही कशी परवड होत आहे, हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या 'ऊंबरणेवाडी' येथील एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती कळा येऊ लागल्या. वाडीमध्ये कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र, ऊंबरणेवाडीपर्यंत पोहोचण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नाही. अखेर गावकऱ्यांनी आणि नातेवाइकांनी तात्पुरती ...

वासांबे ग्रामपंचायतीमध्ये 'मतदार यादी विशेष पुनरीक्षण' मोहिमेला सुरुवात; नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन

इमेज
वासांबे ग्रामपंचायतीमध्ये 'मतदार यादी विशेष पुनरीक्षण' मोहिमेला सुरुवात; नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन रसायनी | प्रतिनिधी               खालापूर तालुक्यातील वासांबे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार 'मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) मोहीम राबवण्यात येणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी आणि मतदार यादीतील त्रुटी दूर करून नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले असून, त्यानुसार ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन माहिती संकलित केली जाणार आहे. यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाईल. या यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिक आपले दावे आणि हरकती नोंदवू शकतील, ज्यांचे निराकरण ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत केले जाईल. या प्रक्रियेनंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. वासांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. उमा संदिप मुंढे...

जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोपाडा NSS विभाग यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

इमेज
जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोपाडा NSS विभाग यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप  प्रतिनिधी | रसायनी :                      ग्राम सुधार मंडळ संचालित, जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोपाडा (ता. खालापूर, जि. रायगड) येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने एका स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शनिवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता रा.जि.प. शाळा गुळसुंडे, ता. पनवेल, जि. रायगड येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. ​या कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून करण्यात आले होते. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गोडी पोहोचावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा, या उदात्त हेतूने हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. संदेश मोरे सर (पर्यवेक्षक व ...